सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेच राजकारण होऊ नये : देवेंद्र फडणवीस | Devendra Fadanvis | Sarkarnama

2021-06-12 0

सिद्धरामेश्वराची यात्रा ही अनेक वर्षांपासून चालतं आलेली परंपरा आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलही राजकारण आणि कुरघोडी होऊ नये,कोणीही त्या करता श्रेय आणि अपश्रेयाचा प्रश्न निर्माण करू नये. अनेक वर्ष समाजाच्या माध्यमातून ही यात्रा समाजाकरिता आयोजित केली जाते,
तशाच प्रकारे ती करावी,आता कोरोनामुळे त्यावरती कांही बंधणे येतील पण त्यासंदर्भात सरकार आणि प्रशासनाने चर्चा करून त्यातून मार्ग काढावा.
दरम्यान भारत नाना भालकेंच नुकतंच निधन झालं आहे.त्यामुळं पोटनिवडणुकीतील उमेदवार कोण याबाबत चर्चा करण सध्या असंवेदनशील आहे.
असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.फडणवीस आज सोलापुरात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या मुलीच्या लग्नाला आले आहेत.

Videos similaires